भरधाव वेगाने डंपर चालविणाऱ्या डंपरचालकाला न्यायालयाने दिली शिक्षा

Google search engine
Google search engine

२ हजार रूपये दंड

न भरल्यास १० दिवसाचा कारावास

देवगड : प्रतिनिधी

देवगड आचरा सागरी मार्गावर भरधाव वेगाने डंपर चालविणाèया डंपरचालकाला देवगड पोलिसांनी पकडले व मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर देवगड न्यायालयाने २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास ही शिक्षा सुनावली आहे.

The court punished the dumper driver who drove the dumper at high speed

सागरी मार्गावर वाळुचा डंपर घेवून भरधाव वेगाने देवगडकडे येणाèया डंपरचालकाला पोलिसांनी पकडले.

डंपरचालक आदित्य प्रमोद कावले(२१) रा.qचदर,देवुळवाडी ता.मालवण हा दि. १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वा.सुमारास वाळूचा डंपर घेवून भरधाव वेगाने देवगडच्या दिशेने जात होता.मसवी येथे देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजन जाधव, पो.कॉ.निलेश पाटील यांनी त्याच्याविरूध्द रस्त्याचा विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने व अविचाराने भरधाव वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली.त्याच्याविरूध्द भादवि २७९ व मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करून देवगड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

देवगड न्यायालयाने याप्रकरणी डंपरचालक आदित्य प्रमोद कावले याला २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास ही शिक्षा सुनावली आहे.