खेड | प्रतिनिधी : खेड शहरा नजीकच्या खारी देवणे पुला नजीक च्या जगबुडी नदी पात्रात एका ६० वर्षीय प्रौढाचा मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला.
रघुनाथ धोंडू शिबे रा. खारी भुवडवाडी असे त्या मृतदेह आढळून आलेल्या प्रौढाचे नाव आहे ते सोमवारी सकाळी ७ वाजता खारी बोरी तारा या ठिकाणी शेतीच्या कामाला जातो असे सांगून घरा बाहेर पडले होते मात्र ते परत न येता त्यांचा ७ रोजी मृतदेह आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हनून नोंद केली आहे.