शिवम चाळकेची नेपाळमधील राष्ट्रीय अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

खेड (प्रतिनिधी) कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयातील कला शाखेच्या प्रथम वर्षातील शिवम चाळके याची नेपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत तो देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

उत्तरप्रदेशातील मथुरा येथील हरदयाळ टेक्निकल कॅम्पस येथे राष्ट्रीय स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ व्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत ३ हजार मीटर धावणे या अॅथेलेटिक्स क्रीडा प्रकारात त्याने सुवर्णपदक मिळवले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष भिकू गोवळकर यांच्याहस्ते त्याचा
सत्कार करण्यात आला.