शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावच्या पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची ‘ज्ञानज्योत’ शिष्यवृत्ती प्रदान.!

कणकवली I मयुर ठाकूर : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावच्या गरीब व होतकरु ५ विद्यार्थ्यांची “ज्ञानज्योत” शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. यामध्ये प्रशालेतील कु. मेहूल वंजारे, कु. भाग्येश कासले, कु. सेजल शिवडावकर, कु. ऋतुजा कदम व कु. नेहा पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी रु. ३६००/- जमा झाले. प्रशालेतील या होतकरु विद्यार्थ्यांना या मदतीमुळे शैक्षणिक साहित्य खरेदी व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेचा उपयोग होणार आहे. गेली कित्येक वर्षे ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी कुडाळ ही संस्था जिल्हयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मदत करत आलेली आहे. ही शिष्यवृत्ती मंजूर व्हावी यासाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक मुकेश पवार यांनी पाठपुरावा केला. ग्लोबल फाऊंडेशनचे विभागीय व्यवस्थापक प्रसाद परब यांचे ज्ञानज्योत शिष्यवृत्ती मंजूरीसाठी मोलाचे सहकार्य लाभले.

प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मसवेकर, शालेय समितीचे अध्यक्ष भाग्यरेखा दळवी, खजिनदार विद्याधर गांवकर, सदस्य अमेय सावेत व गणेश म्हसकर तसेच शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गांवकर यांनी ग्लोबल फाऊंडेशनचे आभार मानले.