व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे वेंगुर्ले येथे उद्घाटन

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले येथील मेळाव्याची जय्यत तयारी : नितीन वाळके

वेंगुर्ले | दाजी नाईक : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ले येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ले येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह श्री. नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य दिव्य होणार असून मेळाव्याची जय्यत तयारी वेंगुर्ले येथे सुरू असल्याचे सांगितले. वेंगुर्ला गाडीअड्डा नाक्यावरील नगरपरिषदेच्या व्यापारी गाळ्यांमध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महासंघाचे कार्यकारी सदस्य श्री. अनिल सौदागर, श्री. निलेश धडाम, श्री राजेश शिरसाट, नंदन वेगुर्लेकर, वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. विवेक खानोलकर यांच्यासह व्यापारी राजीव पांगम, कपिल पोकळे, राजन गावडे, श्रीनिवास सौदागर, नितिन सावंत, नरेंद्र उर्फ बाळा शिरसार, संजय तानावडे, न्हानु किडये, गणेश नार्वेकर, सौ. सुरेखा वाळके, सौ. गीता अंधारी, श्री शेट्ये, मिलिंद शिवलकर, श्री. परब, राजेश सापळे, संदेश सडवेलकर, हरेश खानोलकर, यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.