फळपिक विमा योजनेंतर्गत 34 हजार शेतकऱ्यांना 70 कोटी मिळणार! शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश! – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.

सिंधुनगरी : प्रतिनिधी :प्रधानमंत्री फळपीक योजनेंतर्गत भरपाईची रक्कम इन्शुरन्स कंपनींच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खाती जमा होणे सुरू झालेले असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे नेमका पाठपुरावा करणारे सन्माननीय नारायणराव राणे साहेब आणि सन्माननीय पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे विशेष आभार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले. जिल्ह्यातील 34 हजार शेतकरी मित्रांना 70 कोटी इतकी भरपाई रक्कम प्राप्त होणार आहे यासाठी राज्य सरकारकडे पक्षाच्या वतीने आग्रही पाठपुरावा करण्यात आला होता.यातील तांत्रिक अडचणींची जाणीव असूनही विरोधी पक्षातील नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आंदोलनांची नौटंकी करत होते,पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने भरपाई जमा झाली असा कांगावा आता सुरू करतील.पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात भाजपा सरकार सन्माननिधी म्हणून प्रतिवर्षं 12000/ जमा करतं ते शेतकरी बांधव अश्या कांगाव्याला भीक घालणार नाहीत.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.
भरपाई मिळण्यास थोडा विलंब झाला हे मान्य आहे,पण भाजपा सरकारच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सन्मान देतं याची जाणीवही समस्त शेतकरी वर्गाला आहे.आमदार नितेशजी राणे,निलेशजी राणे,राजनजी तेली या मंडळींनी सुद्धा योग्य प्रकारे मा पालकमंत्री यांच्याकडे हा विषय आग्रहाने मांडला, या सर्वांची परिणीती म्हणून अगदी सणासुदीच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात ही भरपाई रक्कम जमा होत आहे यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि व सर्वच नेत्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत