संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येगांव पाखाडी नं. ४ या शाळेचा अमृतमहोत्सव सोमवार दि. २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या अमृतमहोत्सवी सोहळ्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या अमृतमहोत्सव सोहळ्यामध्ये सोमवार दि. २३ रोजी सकाळी ७.,३० ते ९ प्रभातफेरी, सकाळी ९ ते १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व सरस्वती पूजन, सकाळी १० ते ११ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ ते १ वाजता माजी शिक्षकांचा सत्कार व मनोगत, दुपारी १ ते २ वाजता स्नेहभोजन, दुपारी ३ ते ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ५ वाजता फनीगेम्स, महिला, पुरूष व विद्यार्थी, सायंकाळी ७ ते ८ वाजता शिवराज्य प्रतिष्ठान रायगड अध्यक्ष रोशन पाटील यांचे व्याख्यान, रात्री ८ ते ९ वाजता स्नेहभोजन, रात्री ९ ते ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम माजी विद्यार्थी व देणगीदार यांचा सत्कार असे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमाला खा. विनायक राऊत, आ. शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी जि.प. सदस्या पुनम चव्हाण, माजी पं.स. उपसभापती संतोष चव्हाण, माजी पं.स. सदस्य प्रकाश कानसे, येगाव सरपंच सौ. संगीता होडे, उपसरपंच सचिन चव्हाण, सदस्य सौ. भारती भागडे, कुटरे सरपंच संजीवकुमार गुजर, उपसरपंच सौ. सुरभी जाधव, ग्रा.पं. सदस्या प्रतिक्षा मालप, प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, गटशिक्षणाधिकारी डी. डी. इरनाक, विस्तार अधिकारी (फुरूस बीट) राजअहमद देसाई व केंद्रप्रमुख अविनाश शेंबेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमृतमहोत्सवी कार्यक्रम समिती, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, पालक-शिक्षक संघ व प्रमुख सल्लागार व येगाव पाखाडी व कुटरे बांदकोड ग्रामस्थ, मुंबई व पुणे मंडळ यांनी केले आहे.