कातवड येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून बेंच उपलब्ध

Google search engine
Google search engine

मालवण | प्रतिनिधी : माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कातवड वस्ती शाळा रस्ता आणि दत्त मंदिर नजिक सिमेंटचे बेंच बसविण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांच्या मागणीनुसार भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी ही पूर्तता केली आहे. मंगळवारी या दोन्ही ठिकाणी बेंच बसवून शुभारंभ करण्यात आला.

शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात यावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार माजी खासदार निलेश राणे यांच्या सौजन्यातून सिमेंटचे दोन दर्जेदार बेंच देण्याचा शब्द चिंदरकर, मांजरेकर यांनी पूर्ण केला. मंगळवारी हे दोन्ही बेंच ग्रामस्थांकडे सुपूर्द केले. कोळंब कातवड वस्ती शाळा रस्ता आणि दत्त मंदिर नजिक या महत्वाच्या ठिकाणी हे बेंच मंगळवारी बसविण्यात आले. यावेळी मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, भाजपा गाव अध्यक्ष विनायक धुरी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, हनुमंत धुरी, सत्यवान लोके, शैलेश कनेरकर, शंकर लोके, दिगंबर लोके, अजित धुरी, महादेव नकते, गणपत बागवे, विलास कदम, अर्जुन चव्हाण, अमित लोके, अभिमन्यू बागवे, गणेश नलावडे, मारुती लोके, संदेश लोके, अर्जुन धुरी, उमेश चव्हाण, चंद्रशेखर लोके, कृष्णा चव्हाण, निलेश परब, राजेंद्र धुरी, संदीप वस्त, सुरेंद्र बागवे, शुभम बागवे, राजन चव्हाण, शैलेश चव्हाण आदी उपस्थित होते.