वेंगुर्ले येथे मुख्याध्यापक संघ व भाजपा यांची समन्वयाची बैठक संपन्न

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक : उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ चर्चा

वेंगुर्ले: प्रतिनिधी
कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ व भाजपा यांची समन्वयाची बैठक वेंगुर्ले हायस्कूल मध्ये पार पडली.
वेंगुर्ले येथे मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम.जी.मातोंडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वयक बैठकीत वेंगुर्ले हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे सर , वेतोरे हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय परब सर , आडेली हायस्कूल मुख्याध्यापक देवानंद चव्हाण सर , न्यु.इंग्लीश स्कूल – उभादांडा मुख्याध्यापक उमेश वाळवेकर सर , दाभोली हायस्कूल मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर सर , रा.कृ.पाटकर हायस्कूल मुख्याध्यापक आत्माराम सोकटे सर , सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मि.स्कुल च्या शितल नाईक मॅडम , वेंगुर्ले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.
तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, ता.सरचिटनिस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, नगरसेवक प्रशांत आपटे उपस्थित होते.