सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य अशा क्षेत्रात गेली 32 वर्ष कार्यरत असणाऱ्या योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे एक दिवसीय धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात TWJ Archery अकॅडमी यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० ते संध्या ५:०० या वेळेत सिद्धगिरी मंगल कार्यालय, ईश्वर धाबा समोर, हातखंबा तिठा येथे संपन्न होणार आहे. आपली पारंपारिक युद्ध कला व आत्ताचे आंतरराष्ट्रीय क्रीडा कौशल्य शिकण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे. या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षित अनुभवी शिक्षकांकडून प्रशिक्षण, धनुष्यबाण किट विषयी बेसिक माहिती, धनुष्यबाण हाताळणी व नेमबाजीची प्रात्यक्षिके, स्पर्धेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन, अकॅडमीच्या खेळाडूंचे अनुभव अशा गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत.
सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी वयाची कुठलीही अट ठेवली नसून; आवड असणाऱ्या प्रत्येकाला सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश अनंत मेस्त्री यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री. सचिन सावेकर
7218672777
श्री. संतोष गुरव
9970074202
श्री. महेश खानविलकर
9860026455