आमदार भास्कर जाधव यांचा अटकपूर्व जामीन रद्द व्हावा

 

कुडाळ तालुका भाजपने केली पोलीस ठाण्यात मागणी

कुडाळ | प्रतिनिधी

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून न्यायालयाचा अवमान झाला आहे त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा अशी मागणी कुडाळ तालुका भाजपच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्याजवळ करण्यात आली कुडाळ तालुका भाजपच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर यांची भेट घेण्यात आली यावेळी जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, पप्या तवटे, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, कुडाळ नगरपंचायतीचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, देवेंद्र सामंत, अवधूत सामंत आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडाळ येथील सभेमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे बद्दल केलेल्या अर्वाच्य शब्दातील भाषणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना अटकपूर्व जामीन झाली होता यामध्ये न्यायालयाने आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलीस ठाणे येथे हजेरी लावण्या संदर्भात आदेश दिले होते मात्र आमदार भास्कर जाधव यांनी एक वेळच कुडाळ पोलीस ठाणे येथे हजेरी लावली याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर चिंदरकर यांना विचारणा केली असता याबाबत असलेले आदेश पाहून जर त्यांनी न्यायालयाचा अवमान केला असेल तर तसा अहवाल न्यायालयाला पाठवला जाईल असे सांगितले.