जी-२० परिषदेचं उत्साहात स्वागत
कुडाळ | प्रतिनिधी
जी-२० च्या लोगोची सुमारे १० फुटाची आकर्षक रांगोळी साकारत व तिरंगा फडकावित कुडाळ शहरातील महिलांनी एकत्र येत जी-२० परिषदेचं उत्साहात स्वागत केले.भारतात पहील्यादांच जी-२० परिषद होत असुन सर्व देशात दि. १५ व १६ जानेवारी रोजी या परिषदेचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.कुडाळ येथील संध्या तेरसे, रेखा काणेकर, अदिती सावंत, आरती पाटील, चांदनी कांबळी, मुक्ती परब, विशाखा कुलकर्णी, अक्षता कुडाळकर, तेजस्विनी वैद्य, प्रज्ञा राणे, साधना माड्ये, रेवती राणे, सखु आकेरकर व कुडाळ शहरातील इतर महिलांनी एकत्र येत भाजपा कार्यालया समोरील पटांगणात आकर्षक अशी सुमारे १० फुट बाय १० फुट अशी जी-२० च्या लोगोची रांगोळी काढण्यात आली. या ठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी ही उपस्थिती लावली होती.यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करुन महिलांना जी-२० विषयी माहिती देण्यात आली.जी-२० परिषदेचे स्वागत करताना काढण्यात येणारी रांगोळी करीता कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.