भोस्ते घाटाच्या पाठोपाठ जगबुडी पुलावर अपघात वाढले आहेत
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मालवाहू कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली.
या बाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. मालवाहू कंटेनर मुंबईहून गोव्याच्यादिशेने जात होता. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. त्यात कंटेनर चालक जखमी झाल्याचे समजते. या बाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. यापूर्वी जगबुडी पुलावर लोखंडी पाईपचे वाहतूक करणारा कंटेनर उलटला होता. पुन्हा मालवाहतुकीचा कंटेनर उलटल्याने पुलावरून धावणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.