IND vs NED: बंगळुरूत आज भिडणार भारत आणि नेदरलँड्स

IND vs NED: भारत(india) आणि नेदरलँड्स(netherlands) संघात आज विश्वचषकातील सामना रंगणार आहे. भारताचा या स्पर्धेतील शेवटचा लीग सामना असणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुपारी दोन वाजता दोन्ही टीम आमनेसामने असतील.गेल्या काही वर्षांपासून बंगळुरूचे मैदान चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसाठी ओळखले जाते. येथे आयपीएल स्पर्धेतही खूप धावा बरसतात. सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सफेद बॉलच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये जोरदार धावांचा पाऊस पाहायला मिळतो.

२७ सामन्यात १७ वेळा ३००हून अधिक धावा

एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण २७ वनडे सामने खेळवले गेले आहेत. यात १३ वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवला आहे. तर १४ वेळा आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळवता आला. तसेच येथे टॉस जिंकणाऱ्या संघाला आव्हानाचा पाठलाग करायला आवडते. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ४०१ इतकी होती. ही धावसंख्या वर्ल्डकपदरम्यान बनली. तसेच येथे खेळवण्यात आलेल्या २७ सामन्यांमध्ये १७ वेळा संघांनी ३००हून अधिक स्कोर केला.

वेगवान गोलंदाजांना मिळते यश

या विश्वचषकात बंगळुरूत आतापर्यंत ४ सामने खेळवण्यात आले. यात दोन सामने कमी धावसंख्येचे होते मात्र दोन सामन्यात खूप धावांचा पाऊस पाहायला मिळाला. न्यूझीलंडने येथे ४०१ धावांचा विशाल स्कोर उभा केला होता. तर ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकात ३६७ धावा केल्या. या मैदानावर षटकारही मोठ्या प्रमाणात ठोकले जातात. हिटमॅन रोहित शर्माने ४ सामन्यांत २८ षटकार ठोकले आहेत.

आज कशी असेल पिच?

बंगळुरूच्या विकेटमध्ये आज कोणत्याही बदलाची शक्यता नाही. ही विकेट बॅटिंग फ्रेंडली आहे. येथील बाऊंड्रीज छोटी आहे. अशातच येथे षटकारांचा पाऊस बरसू शकतो.