Diwali 2023: दिवाळीत हा आहे लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त

मुंबई: दरवर्षी कार्तिकअमावस्येच्या दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी दिवाळी १२ नोव्हेंबर म्हणजेच रविवारी साजरा केला जात आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पुजा केली जाते. यामुळे झोपलेले भाग्य उठते. या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करते. जे कोणी लक्ष्मी मातेची मनोभावे पुजा-आराधना करतात त्यांची प्रार्थना जरूर स्वीकार केली जाते.

लक्ष्मीपूजन

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पुजा केली जाते. तसेच आपल्याकडे असलेल्या धनाची पुजा केली जाते.

दिवाळी पुजेसाठी शुभ मुहूर्त

यंदाच्या दिवाळीत पुजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.२८ मिनिटांपासून ते रात्री ८.०७ वाजेपर्यंत आहे. यात वृषभ काल ५.३९ मिनिटांपासून ते ७.३३ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत पुजा करणे उत्तम राहील. लक्ष्मी पुजनासाठी १ तास ५४ मिनिटांचा अवधी मिळणार आहे.

दिवाळीला गणपतीच्या पुजेने मिळतात लाभ

दिवाळीला गणपतीची पुजा केल्याने प्रत्येक अडथळे दूर होतात. भगवान गणपतीची पुजा केल्याने धनलाभ होतो.