पटकीदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी सुहासिनींच्या लांबच लांब रांग

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट

कणकवली (प्रतिनिधी)
शहरातील पटकीदेवी मातेचा जत्रोत्सव आज मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.मंदिराला विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी सुहासिनींची मंदिर परिसरात लांबच लांब रांग लागली होती.गावराठीच्या या मंदिरात सकाळी विधिवत पूजन करण्यात आले.श्री.देव रवळनाथ मंदिरात मानकरी एकत्र होवून तेथून परडी (काकडा)पेटवून वाजत गाजत पटकीदेवी मंदिरात आणण्यात आला.तद्नंतर वार्षिक मानाची ओटी खोतांच्या मंडळींच्या हस्ते भरण्यात आली.दुपारनंतर गावातील तसेच इतर सुहासिनीनी ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला तर सायंकाळी काकड्याचे विसर्जन नदीत करून या जत्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी गावराठीचे मानकरी,पेठकरी मंडळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.