नॅक समितीच्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला ‘अ‘मानांकन

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : दाजी नाईक
नॅक समितीने केलेल्या मुल्यांकनामध्ये वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास ‘सी-जी-पी-ए ३.२३‘ सह ‘ए‘ ग्रेड प्राप्त झाली आहे. या मानांकनामुळे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यमापन व अधिस्वीकृती परिषद, बेंगलोर नॅकच्या तज्ज्ञ समितीने ११ व १२ जानेवारी रोजी भेट दिली. या समितीचे चेअरमन डॉ.खाजा अल्थाफ हुसेन (हैद्राबाद तेलंगणा), समन्वयक सदस्य डॉ.बी.एस.सुरेश (म्हैसूर-कर्नाटक) व सदस्य डॉ.श्रीकांता सामंता (नबाग्राम-पश्चिम बंगाल) यांनी सर्व विभागांना भेट देत महाविद्यालयाच्या कामकाजासंबंधी माहिती घेतली. तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली.

महाविद्यालयास ‘अ‘ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ (कोल्हापूर)चे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ.मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट यांचे कौतुक केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा.डॉ.डी.एस.पाटील, प्रा.डॉ.एम.बी.चौगले, प्रा.एस.एच.माने, प्रा.डॉ.एम.एम.मुजुमदार, प्रा.डॉ.बी.जी.गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.