Murder: कर्नाटकात दिवसाढवळ्या घरात घुसून आई आणि तीन मुलांची हत्या

बंगळरू: कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात एक महिला आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी रविवारी याची माहिती दिली. या चार जणांचे मृतदेह घरात आझळले. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोराने सर्वात आधी महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली. मात्र तेव्हाच महिलेचा १२ वर्षांचा मुलगा घरात आला. त्याला पाहताच हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला आणि हत्या केली.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मृत व्यक्तींच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याने जेव्हा किंकाळ्यांचा आवाज ऐकला तेव्हा तो तेथे आला मात्र हल्लेखोराने त्यालाही धमकावले. महिलेच्या सासूवरही चाकू हल्ला. तिच्यावरही चाकूने वार करण्यात आले. दरम्यान, तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लुबाडण्याच्या हेतूने नाही झाली हत्या

उडुपी पोलीस अधीक्षकांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले, आज नेजर गावाजवळ चार लोकांची हत्या करण्यात आली. हसीना आणि तिच्या तीन मुलांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या हत्येचा हेतू चोरीचा नव्हता. तर वेगळाच काही आहे. आम्हाला शेजाऱ्यांकडून सकाळी १० वाजता हत्येची माहिती मिळाली. शेजाऱ्यांनी या घरातून ओरडण्याचा तसेच किंकाळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच पोलिसांना फोन केला.