FD Rates : या १० बँका देतायत FDवर जबरदस्त रिटर्न, पाहा संपूर्ण यादी

मुंबई: तुम्ही जर शेअर मार्केटच्या सततच्या चढ-उताराने कंटाळला असाल तर तुम्ही तुमचे पैसे बँक एफडीमध्ये ठेवू शकता. बँक सध्या चांगले रिटर्न देत आहे. काही स्मॉल फायनान्स बँक तर ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर गेत आहे. सर्व कॅटेगरीमध्ये स्मॉल फायनान्स बँका सर्वाधिक व्याजदर देत आहेत. जर आपण प्रायव्हेट सेक्टरबाबत बोलायचे झाल्यास डीसीबी बँक सर्वाधिक व्याजदर देत आहेत. तर सरकारी बँकांमध्ये पंजाब अँड सिंध बँक एफडीवर सर्वाधिक रिटर्न देत आहेत.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

सामान्य ग्राहकांसाठी ही बँक सात दिवसांपासून ते दरवर्षी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.५ टक्के ते ९ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. वरिष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या एफडीवर ४.५ टक्के ते ९.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. नवे दर ९ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सात दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर सामान्य ग्राहकांसाठी ४ ते ८.६ टक्के व्याजदर देत आहेत. वरिष्ठ नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.५ ते ९.१ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहे.

डीसीबी बँक

डीसीबी बँक एफडीवर सामान्य ग्राहकांना ३.७५ ते ७.९ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ४.२५ ते ८.५० टक्क्यांनी व्याजदर देत आहे. हे दर २७ सप्टेंबर २०२३पासून लागू करण्यात आले आहेत.

आरबीएल बँक

एफडीरवर सामान्य ग्राहकांना ही बँक ३.५० टक्क्यांपासून ते ७.८० टक्के व्याजदर ऑफर करत आहे. तर वरिष्ठ नागरिकांना ४ ते ८.३० टक्क्यादरम्यान व्याजदर देत आहे. हे दर १६ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहेत.

आयडीएफसी फर्स्ट बँक

आयडीएफसी फर्स्ट बँक सामान्य ग्राहकांसाठी एफडीवर ३.५० ते ७.५ टक्के व्याजदर देत आहे. दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांसाठी बँक ४ ते ८.२५ टक्के व्याजदर देत आहे. ५४९ दिवसांपासून ते दोन वर्षात मॅच्युअर होणाऱ्या रकमेवर ७.७५ टक्के व्याजदर दिले जात आहे.

आयसीआयसीआय बँक

खासगी क्षेत्रातील बँका सर्व ग्राहकांना एफडीवर ३ टक्के ते ७.१ टक्क्यादरम्यान व्याजदर देत आहेत. दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांना विविध कालावधीच्या एफडीवर ३.५० ते ७.६५ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक विविध कालावधीसाठी ३ टक्के ते ७.२० टक्के व्याजदर ऑफर करत आहे. दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांसाठी ३.५ टक्के ते ७.७५ टक्के व्याजदर देत आहे.