रत्नागिरी तालुक्यातील गावखडी – सुरुबन येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. अमित प्रभाकर तोडणकर (६२, रा. भंडारवाडी गावखडी, ता. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित तोडणकर हे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास मासेमारीसाठी जाळे घेऊन येथील सुरुबन परिसरात मासे पागण्यासाठी गेले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून घरच्यांसह ग्रामस्थांनी शोध घेतला. त्यावेळी सुरुबन येथे ते मृतावस्थेत आढळले. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
Home महाराष्ट्र रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी – सुरुबन येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्यावृद्धाचा समुद्रात बुडून मृत्यू