रत्नागिरी तालुक्यात पहा हा कुठे घडलं हे…
रत्नागिरी | प्रतिनिधी :रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे किनारपट्टीवर भलामोठा व्हेल मासा वाळूत अडकला आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर हा मासा किनाऱ्यावर आला आणि ओहोटीच्या पाण्यामुळे वाळूत अडकल्याने त्याला परत पाण्यात जाता येईना त्यामुळे त्याला गणपतीपुळे येथील नागरीकांकडून जीवदान देण्यासाठी पाण्यात ढकलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे व्हेल मासा आकाराने मोठा असला तरीही ते व्हेलचे पिल्लू असल्याचे जाणकार सांगत आहेत.
पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला स्थानिक आणि वन विभागाकडून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असून मत्स्य विभागच्या बोटीच्या साहाय्याने त्याला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे. ओहटीच्या पाण्यामुळे व्हेलं माशाच पिल्लू वाळूत अडकून पडल्याची बातमी समजताच किनाऱ्यावर स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली आहे.