श्री भराडी देवी मंदिर सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा १७ रोजी !

Google search engine
Google search engine

मसुरे | झुंजार पेडणेकर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळा १७ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरामध्ये आंगणे कुटुंबीया मार्फत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ रोजी सकाळी ९.०० वा. ब्राम्हणाच्या हस्ते पूजा अर्चा व अभिषेक, दुपारी १२.०० वा. सुवर्ण कलश, पूजा ध्वज पूजा, दुपारी १२.३० वा. आरती, तीर्थ- प्रसाद, दुपारी १.०० वा. महाप्रसाद , संध्याकाळी – ७.००वा. बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांचे सुस्वर भजन, रात्री १० वा समुद्र मंथन मुंबई निर्मित विनोदी नाटक “वाकडी तिकडी ” होणार आहे. या नाटकात टीव्ही स्टार अंशुमन विचारे सह इतर कलाकार भूमिका साकारणार आहेत. १८ रोजी रात्री १० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रत्येकी सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी बाबू आंगणे (७५८८४०९५८९), दिनेश आंगणे(९४२०२०६७८२) प्रसाद आंगणे (९४०३६३९०७२) येथे संपर्क साधावा. कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.