गावखडी येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील गावखडी येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना रविवार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वा.सुमारास उघडकीस आली.
अनंत प्रभाकर तोडणकर (56,रा.गावखडी भंडारवाडी,रत्नागिरी) असे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.रविवारी अनंत तोडणकर हे नेहमीप्रमाणे सकाळी 9 वा.गावखडी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाळे घेउन गेले हेाते.ते 11 वा.पर्यंत घरी न परतल्याने त्यांचे नातेवाईक सुमद्रकिनारी गेले असता त्यांना समुद्रकिनार ते उपडया स्थितीत मिळून आले.त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.