संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा..!
कणकवली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल मराठी माणसांना फसवणारा, भ्रष्टाचारी, छत्रपती घराण्याचा अपमान करणारा वाचाळवीर संजय राऊत यांचा भारतीय जनता पार्टी कणकवली तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. मंत्री राणे साहेबांवर अयोग्य वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राऊत यांचा बंदोबस्त करण्यात यावा व तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल.
Kankavali BJP strike at police station; Otherwise, he warned of starting a movement
अशी आक्रमक भूमिका मांडत कणकवली तालुका भाजपच्या वतीने भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष संतोष कानडे तालुकाध्यक्ष भाजपा कणकवली ग्रामीण, तालुकाध्यक्ष भाजपा कणकवली मिलिंद मेस्त्री, माजी. जि. प. अध्यक्षा संजना सावंत , नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक आण्णा कोदे, प्रज्ञा ढवण, नगरसेवक शिशिर परुळेकर, आशिये सरपंच महेश गुरव, विजय चिंदरकर, श्री. दळवी, यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना निवेदन देण्यात आले. संजय राऊत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असे सांगत संतोष कानडे यांनी आक्रमक भूमिका घ्यायला लावू नका असेही सांगितले.