नवी दिल्ली: देशाची राजधानी आणि त्याजवळील आसपासच्या क्षेत्रात प्रदूषणाने लोकांचे जगणे कठीण केले आहे. लोकांना विषारी हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. मुलांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी ही विषारी हवा जणू मृ्त्यूचे आमंत्रणच आहे. प्रदूषण वाढवण्यात सिगारेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सिगारेट केवळ वाढते प्रदूषणासाठी कारणीभूत नाही आहे तर यामुळे लोक आपला जीवही गमावत आहेत. WHOच्या रिपोर्टनुसार सिगारेटमुळे दररोज तब्बल हजारोंच्या संख्येने मृत्यू होतात.
काय म्हणतो रिपोर्ट?
तंबाखूचे सेवन करणारे अर्धे लोक यामुळे आपला जीव गमावतात. तंबाखूमुळे दरवर्षी तब्बल ८० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यामुत १३ लाख लोक असे आहेत जे स्वत:सिगारेट ओढत नाहीत मात्र इतर लोकांच्या सिगारेटच्या धुरामुळे यांचा मृत्यू होतो.
सर्वाधिक पुरुष करतात तंबाखूचे सेवन
जगभरात एकूण तंबाखू खाण्याऱ्यांची संख्या १.३ अब्ज आहे. यातील ८० टक्के लोकसंख्या निम्न आणि मध्यम वर्गातील देशांची आङे. २०२०मध्ये जगातील २२.३ टक्के लोकसंख्येने तंबाखूचा वापर करते यात ३६.७ टक्के पुरुष आणि ७.८ टक्के महिला आहेत. तंबाखू महामारीपासून बचावासाठी WHOच्या सदस्य देशांनी २००३मध्ये WHO फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन टोबॅको कंट्रोलला वापरले आहे.