चार तास लाभार्थी खोळंबून, नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने चालवला लोकांचा छळ
तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या केबिन समोर लोकांची गर्दी,त्यांनाही त्याचे गांभीर्य नाही
कणकवली :कणकवली तहसीलदार कार्यालयात प्रतिज्ञापत्र करण्यासाठी अधिकारीच नसल्यामुळे तब्बल चार तास जनतेचा खोळंबा झाला. दोन्ही नायब तहसीलदारांच्या केबिन सोबत २५ ते ५० लोकांची गर्दी झालेली असताना या अधिकाऱ्यांनाही या घटनेचे गांभीर्य जाणून आलेले नाही. तब्बल १२.४५ वाजता एका अव्वल कारकुन दर्जाच्या एका अधिकाऱ्याने लोकांवर मेहरबानगी करत असल्याच्या आविर्भावात प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली.
कणकवली तहसीलदार कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी यांच्या असलेला विसंवाद आज पुन्हा दिसून आला. दोन नायब तहसीलदार ज्या ठिकाणी बसतात त्यांच्या केबिन समोर प्रतिज्ञापत्रे घेऊन लोक चार तास तिष्ठत उभे होते मात्र त्यांची कोणालाच दया आलेली नाही. ज्या अव्वल कारकून सत्यवान माळवे यांची प्रतिज्ञापत्रावर सही करण्याची जबाबदारी होती त्यांनी तर ते आपले कामच नाही अशी भूमिका घेत चार तासानंतर तो पदभार स्वीकारला आणि लोकांवर उपकार करत असल्याच्या आविर्भावात प्रतिज्ञा पत्रावर सह्या केल्या. दरम्यान प्रतिज्ञापत्र पाहणे आणि त्यावर सह्या करणे असले हे काम करणे माझे नाही अशा शब्दातही येणाऱ्या लोकांना या अधिकाऱ्याने सुनावले.