मुन्ना देसाई इलेव्हन व स्मार्ट नेट रायगड उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल.

Google search engine
Google search engine

स्पर्धेचा दुसरा दिवस

रत्नागिरी : ओम साई स्पोर्टस् आयोजित व मा.ना. उदयजी सामंत पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे चालू असलेल्या डे – नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुन्ना देसाई इलेव्हन व स्मार्ट नेट रायगड हे दोन संघ उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहे.

लीग स्पर्धेचा दुसरा दिवस अतिशय रोमहर्षक झाला. स्मार्ट नेट रायगड, मुन्ना देसाई इलेव्हन व श्लोक आर्या डोंबिवली तिन्ही संघांची गुण समान झाले. शेवटी नशिबाची साथ स्मार्ट नेट रायगड व मुन्ना देसाई इलेव्हन संघ यांच्या बाजूने लागली.

या गटात पाच संघ लिक स्पर्धेमध्ये खेळले. त्यातील तीन संघांची गुणसंख्या सम समान झाली. चिठ्ठी टाकून दोन संघाना फुडे चाल देण्यात आली.

स्मार्ट नेट रायगड संघ या गटामध्ये अतिशय बलाढ्य होता. यामध्ये अंकुर सिंग, अजित मोहिते, विश्वजीत ठाकूर यासारखे नावाजलेले खेळाडू होते. पण स्मार्ट नेट रायगड विरुद्ध श्लोक आर्या डोंबिवली या संघाचा सामना अतिशय चुरशीचा झाला. यामध्ये श्लोक आर्या डोंबिवली संघाने स्मार्ट नेट रायगड संघाचा पराभव करून या गटांमध्ये धक्कादायक निकाल दिला. त्यामुळे गुणतालिकेचे सूत्र शेवटच्या सामन्यापरेंत उत्कंठेला पोहोचले होते. मुन्ना देसाई इलेव्हन संघाकडून जयदीप भोडीवले, राजेश सोरटे, आरफ शेख यांनी अतिशय संयमी सुरेख खेळी करत आपला विजय साजरा केला.

श्लोक आर्या डोंबिवली संघा कडून विशाल म्हात्रे, केतन म्हात्रे, विशाल निघोटे, सूरज पाटील, विशाल शाह यांनी अतिशय नियोजनबद्ध खेळी करून आपला विजय मिळवला. व आपली दावेदारी या गटात कायम ठेवली होती पण नशिबाची साथ श्लोक आर्या डोंबिवली संघाला मिळाली नाही. त्यामुळे या गटातून हा संघ बाहेर फेकला गेला.