रत्नागिरी : आसमंत फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा शनिवारी (ता. २१) आणि रविवारी (ता. २२) होणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष समुद्रकिनारे व खारफुटी जंगलात सफर घडणार आहे. खारफुटी सहलीकरिता समुद्र मित्र श्रावणी खानविलकर (मो. ८४४६५३४०८७) यांच्याशी १८ व १९ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळात नावे नोंदवावीत. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी मिळेल, असे आवाहन आसमंत फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
दि. २१ आणि दि. २२ जानेवारीला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. या वेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील खारफुटी जंगलाची सफर संजीव लिमये व संतोष तोसकर घडवतील. तसेच सायंकाळी दुपारी ३ ते ६ या वेळेत मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे घडवतील. याच कालावधीत देखणी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पाहण्याची संधी पर्यटक आणि रत्नागिरीकरांना मिळणार आहे.