सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने रविवारी २२ जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चा

Google search engine
Google search engine

लांजा | प्रतिनिधी : सकल हिंदू समाज लांजा तालुका च्या वतीने रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शहरातील श्री बसवेश्वर चौक ते योगी हॉटेल असा विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
आपल्या हिंदू मुली व माता भगिनींच्या नेतृत्वात हिंदू समाज आणि संस्कृतीचा सर्वनाश करू पाहणाऱ्या लव जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या या सर्व राष्ट्रविधातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनवून हिंदू धर्म व राष्ट्राचे रक्षण करावे या मागणीसाठी समस्त सकल हिंदू समाज लांजा तालुका च्या वतीने या हिंदू जनअक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.लव जीहाद म्हणजे हिंदूधर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून इतर धर्म स्वीकाराला भाग पाडणे आणि मग त्या मुलींबरोबर लग्न करून संतान प्राप्त करून घेऊन इतर धर्मीय लोकसंख्या वाढवणे आणि हिंदू लोकसंख्या कमी करणे, धर्मांतरण म्हणजे हिंदू धर्मातील लोकांना आमिष दाखवून, बळाचा वापर करून अथवा एखाद्या समस्येचा फायदा उठवून धर्म परिवर्तन करून घेतले जात आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हटले जाते. तेच गोधन आज धोक्यात आले आहे .काही धर्मांत लोकांकडून ३३ कोटी देवांचा वास असणारे आपल्या आईला, कसायला विकून तिची राजरोसपणे कत्तल चालू आहे. या संदर्भात कडक कायदे व्हायला पाहिजेत. म्हणूनच हा जन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांनी या हिंदू जन आक्रोश मोर्चा सहभागी होऊन आपला आवाज, ताकद दाखवून द्यावी असे आवाहन सकल हिंदू समाज लांजा तालुका च्या वतीने करण्यात आले आहे