काँग्रेस स्वयंरोजगार जिल्हाध्यक्षपदी म्हादलेकर

खेड | प्रतिनिधी : काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शांताराम म्हादलेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत जाधव व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

संघटना बळकटीसाठी देत असलेल्या योगदानाची दखल घेवून म्हादलेकर यांच्याकडे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांची नोंदणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाहीही म्हादलेकर यांनी दिली.

याप्रसंगी उपतालुकाध्यक्ष रमेश घोले, अजित चव्हाण, हनिफ हुर्जुक, विजय जैन पोत्रिक, अशोक घाणेकर, युवकचे तालुकाध्यक्ष स्वराज गांधी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते