हरवलेला मोबाईल मालकाच्या दिला ताब्यात

Google search engine
Google search engine

 

ट्राफिक पोलीस विनोद चव्हाण व पटवर्धन चौकातील स्टॉलधारक सुहासिनी बोंद्रे यांचा प्रमाणिकपणा.!

कणकवली : कणकवली येथील सेंट्रीग व्यवसायीक दिलीप मालवणकर रा. कणकवली यांच्याकडे काम करणारे धुपदेव प्रसाद यांचा मोबाईल पिशवीमध्ये होता. दरम्यान बाजारातील काही काम आटोपून आल्यावर त्यांची त्या दरम्यान पिशवी गहाळ झाली. कणकवली पटवर्धन चौक येथील स्टॉलधारक असलेल्या सौ. सुहासिनी गिरीधर बोंद्रे यांना सदर मोबाईल असलेली पिशवी सापडली. त्यांनी ती पिशवी पटवर्धन चौक येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली. प्रामाणिकपणा दाखवत विनोद चव्हाण यांनी माहिती घेत सदर सॅमसंग कंपनीचा १२००० रुपये किंमतीचा मोबाईल खात्री करून मालकाच्या ताब्यात दिला. त्यांच्या प्रमाणिकपणाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.