शिवगडावर मशालोत्सव अन् शिवजयकाराच्या अनोख्या संकल्पनेतून फोंडाघाट मध्ये शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण

श्रीशिवप्रतिष्ठान- हिंदुस्थान आणि शिवशंभो कला- क्रीडा मंडळाचा दीपोत्सवात संस्कारक्षम उपक्रम !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवशंभो कला क्रीडा मंडळ फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने, कोल्हापूर- फोंडाघाटच्या सीमेवर जैवविविधतेने समृद्ध, दाजीपुरच्या अभयारण्य दडलेल्या “शिवगडा” वर संधिप्रकाशात मशाली प्रज्वलित करून, आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज की जयss ,श्री संभाजी महाराज की जयss, जय भवानीss जय शिवाजीss,हर- हर महादेव sss च्या बुलंद घोषणांनी सह्याद्री प्रतिध्वनीत होऊ लागला. आणि मशालोत्सवातून संस्कारक्षम उपक्रम प्रकाशमान झाला….

दोन्ही मंडळातील मावळ्यांनी दुपारी ३:३० वाजता शिवगड च्या कडे चढण्यास सुरुवात केली. अत्यंत शिस्तबद्धपणे एकेक कडा चढताना धारकरी- मावळे- ध्वजधारकांचा महाराजांचा जयजयकार करीत होते. घोषणा डोंगरदऱ्यामध्ये घुमू लागल्या आणि अवर्णनीय उत्साहात सर्वजण अखेर शिवगडावर पोचले. कुणाच्याही चेहऱ्यावर थकावट नव्हती. उलट उदंड उत्साह ओसंडून वाहत होता. शिवगडावर पोहोचल्यानंतर श्रीशिवछत्रपती च्या परंपरेप्रमाणे सर्वांनी प्रेरणा मंत्र आणि ध्येयमंत्र्याच्या साक्षीने शिवपूजन आणि आरती केली. ध्वजारोहण करण्यात आले. रिंगण करून सर्वांनी शिवकालीन गीते, लोककला, गोंधळ ,भजन इत्यादी सादर करून इतिहास जागवण्याचा प्रयत्न केला.

 

 

यावेळी बोलताना धारकरी अक्षय धुरी यांनी शिवरायांची सुराज्याची संकल्पना विशद केली, देव- देश- आणि धर्मासाठी शिवरायांनी अखेरच्या श्वासापर्यंत परिश्रमपूर्वक अन्यायमुक्त स्वराज्याची स्थापना केली. आज परधर्मीयांच्या वल्गना मुळे, हिंदू धर्मावरील संकटाबद्दल प्रत्येकाने सजग होणे आवश्यक आहे. यासाठीच हा मशालोत्सव सर्व तळागाळातील हिंदूंचे प्रेरणा-स्रोत बनावे, म्हणून हा उपक्रम ! सुराज्य बनविण्यात तळ कोकणातून डोंगर पठारावर येणारा माल, परकीयांच्या हालचाली- बारकावे न्याहळण्यासाठी हा गडद अभयारण्यात दडलेला “शिवगड” या टेहळणी किल्ल्यावरूनच, हा उपक्रम सगळ्यांनाच ऊर्जा देईल, असा विश्वास वाटतो.
यावेळी अशोक लाड, भाई लाड, अक्षय लाड, अभिजीत लाड, गौरव लाड,विनोद लाड, विनोद पेंडूरकर, बाळा लाड,निखिल तेली, अभिजीत मेस्त्री यांचे सह सुमारे ५०-६० शिवप्रेमी मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. सदस्य संकेत तानवडे यांनी सर्वांची चहापान व रात्री भोजनाची निस्वार्थ सोय केली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे दशक्रोशीत कौतुक होत आहे….