चाफेली साहित माणगाव खोऱ्यातील कुठल्याही गावासाठी विकासनिधीची कमी भासू देणार नाही – निलेश राणे.
हळदीचे नेरूर, चाफेली येथे निलेश राणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत केरवडे कर्याद नारूर येथील चाफेली महसुली गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज चाफेली येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेली दहा वर्षे माणगाव खोऱ्यात म्हणावा तसा विकासनिधी आला नाही. विकासाच्या दृष्टीने आम्ही वंचित राहिलो, गावातील अनेक रस्ते अजूनही कच्चेच आहेत मात्र राज्यातील सत्ताबदल होताच भाजपचे नेते निलेश राणेंच्या माध्यमातून आमच्या गावात विकासगंगा आली अश्या शब्दात केरवडे माजी सरपंच श्री. दिलीप सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी चाफेली शाळा, चाफेली येथील कॉजवे तर चाफेली लिंगेश्वर मंदिर जवळ जाणाऱ्या रस्त्याचं भूमीपूजन भाजपचे नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष श्री. रणजित देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. विनायक राणे, कुडाळ मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, दीपक नारकर, पप्या तवटे, मोहन सावंत, दादा बेळणेकर, सचिन धुरी, राजा धुरी, सुनील बांदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते