चेक बाउंन्स प्रकरणी एक महिना तुरूंगवास

Google search engine
Google search engine

देवगड तालुक्यातील महाळुंगे येथील सुरेश तुकाराम घाडीगावकर यांच्याकडून विकत घेतलेल्या झाडांच्या मोबदल्यापोटी दिलेला ७०,००० चा धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्याचे कारणामुळे अनादरीत झाल्याप्रकरणी दाखल खटल्यात पोंभुर्ले येथील रहिवासी श्री.कमलुद्दीन अ. डोंगरकर याला देवगडचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. बी. वाळके यांच्या न्यायालयाने एक महिना तुरूंगवास आणि रु.८५,०००/- दंड एवढी शिक्षा ठोठावली आहे.

याकामी फिर्यादीचे वतीने अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. अन्वी कुळकर्णी, अॅड. वीणा लिमये व अॅड. अपर्णा
पराजंपे यांनी काम पाहिले.सन २०१७ साली गाव मौजे महाळुंगे येथील फिर्यादीचे मालकीच्या जमिनीतील आंबा, हेळा, फणस, नाणे या प्रकारातील मौल्यवान झाडे आरोपीने विकत घेतली होती. सदर विकत घेतलेल्या झाडांचा मोबदला अदा करण्यासाठी आरोपीने डोंगरकर याने फिर्यादी घाडी यांना रक्कम रु.७०,००० /- (रुपये सत्तर हजार मात्र) चा धनादेश दिला होता. सदर धनादेश आरोपीचे खात्यात पैसे नसल्यामुळे अनादरीत झाल्याने आरोपीविरुध्द धनादेश अनादराचा खटला देवगड न्यायालयात चालला होता. फिर्यादीचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादामुळे व सादर केलेले पुरावे ग्राह्य मानत मे.
देवगड न्यायालयाने आरोपी डोंगरकर याला १ महिने कारावास आणि रु ८५,००० /- द्रव्यदंड अशी
शिक्षा दिली आहे. तसेच दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे.