बनावट दागिने देऊन बँकेची फसवणूक प्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सोन्याचे बनावट दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिघाही संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले. दरम्यान, या गुन्ह्यात अन्य साथीदार असल्याच्या संशयावरून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
सावंतवाडी शहरातील एका खाजगी बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून पावणे दोन लाख रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात कोल्हापूर राजारामपुरी येथील तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ऋतेश सुरेश माजिक याला तातडीने बँकेतून ताब्यात घेण्यात आले होते तर कोल्हापूर येथील सोनार अमोल पोतदार वं सागर ऊर्फ नरेंद्र नलवडे या दोघांना कोल्हापूर येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील तिन्ही संशयित यांना दोन दिवस पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली होती.
दरम्यान, बुधवारी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रावांनगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. यातील सोनार अमोल पोतदार यांनेच हे दागिने बनवून संशयित आपल्या दोन आरोपीना दिले आहेत त्यांचे फोन कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. तर ऋतेश माजीद वं सागर नलवडे यांनी संगनमताने अशाच प्रकारे तीन बँकाची फसवणूक केलयांचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोल्ट्रीचा व्यवसायात नुकसान झाल्याने बँकाचे कर्ज फेडण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली संशयित ऋतेश माजिक याने दिली आहे.