मालवण | प्रतिनिधी : देवबाग मोंडकरवाडी येथील एका महिलेस मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी तिच्या दिरा विरोधात मालवण पोलीस स्थानकात भादवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार १७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता दिराने आपणास दगडाने मारहाण करून दुखापत केली व आपल्याला व पतीला ठार मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. याप -करणाचा तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष शिवगण करीत आहेत.