पाटपन्हाळे | वार्ताहर : पंचायत समिती, गुहागर येथे पंचायत समिती अधिनस्त असणाऱ्या विविध विभागातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी पंचायत समिती गुहागर अंतर्गत जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.क्रिडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, कॅरम, व्हॉलीबॉल, १०० मी धावणे, होममिनिस्टर, संगीत खुर्ची, महागायक/महागायिका, रांगोळी स्पर्धा इ. खेळांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणेसाठी निलेश पाटील, चैताली हळये श्रीम. श्रध्दा वराडकर व इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.या स्पर्धांमध्ये यशस्वी आणि भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष गुहागर चंद्रकांत झगडे, सचिव श्रीम. सोलकर, सह सचिव धुमाळ, कोषाध्यक्ष मिलिंद कदम, सहकोषाध्यक्ष वैभव कदम व कलाक्रिडा सांस्कृतिक मंडळातील इतर सर्व सदस्य यांच्याकडून हार्दीक अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार प्रतिभा वराळे, सहा. पो. नि. तुषार पाचपुते, पो.उपनिरीक्षक पवन कांबळे व इतर अधिकाऱ्यांनी येऊन शुभेच्छा दिल्या.