पाटपन्हाळे | वार्ताहर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ या शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्वराज शिंदे याने २७६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ६ वा तर गुहागर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. सत्यजित सानप याने २५८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १६ वा तर गुहागर तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. अनिकेत सावंत याने २५६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा तर गुहागर तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला.विशेष म्हणजे वरील तिन्ही विद्यार्थ्यानी नवोदय प्रवेश परीक्षेत देखील अशाच प्रकारे उत्तुंग यश प्राप्त केले होते. तसेच चैतन्य चिमण व प्रसाद मुरकुटे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वीतांचे, मार्गदर्शक शिक्षक अमोल धुमाळ यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती शाखा गुहागरकडून सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे गुहागर तालुकाध्यक्ष अरविंद पालकर, विकास पाटील, विवेक जोशी, राहुल आमटे, पत्रकार गणेश किर्वे, मुख्याध्यापिका विद्या हिरवे, चंद्रकांत झगडे, नेहा जोगळेकर, मृणाल झगडे, ईश्वर हलगरे, मुक्ता बेंडल व विद्यार्थी उपस्थित होते.