देवगड येथील युथ फोरम आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत समीर चांदेरकर प्रथम

युथ फोरम देवगड आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन दि.१६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत गुरुदक्षिणा प्रेक्षागृह शेठ म.ग.हायस्कुल येथे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील एकूण २० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक समीर चांदेरकर , द्वितीय क्रमांक काशिनाथ चारी तृतीय क्रमांक तन्मेश परब यांनी पटकाविला तर उत्तेजनार्थ केदार टेमकर , प्रशांत सुवर्णा, साईनाथ पारकर यांनी मिळविला आहे.या रांगोळीचे प्रदर्शन १७ ते १९ नोव्हेंबर तीन दिवस चालणार आहे. रांगोळी कलाकारांनी रांगोळीमध्ये हुबेहूब सादरीकरण जिवंतपणा निर्माण केला आहे.नागरीकांनी या रांगोळी प्रदर्शनाला भेट द्यावी .असे आवाहन युथ फोरम देवगड अध्यक्ष ऍड सिद्धेश मांणगावकर,रांगोळी स्पर्धा समिती प्रमुख प्रणव नलावडे यांनी केले आहे.