हातखंबा | वार्ताहर : श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत हातखंबा येथील श्रीकांत व भाईशेठ मापुस्कर आर्ट्स कॉमर्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची छोटी सहल हातखंबा येथील श्रीयुत अनिल खातू यांच्या बागेमध्ये आयोजित केली होती.
निसर्गाच्या सहवासात आयोजित केलेल्या या सहलीमध्ये विद्यार्थ्याने गाणी, नकला, विनोद चुटके, नृत्य सादर करून धमाल मजा केली. तसेच विद्यार्थ्यांनी शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. या सहलीमध्ये ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष रानमाळे, सहल प्रमुख प्रा. सौ मनस्वी जाधव व प्रा सिद्धेश कळंबटे सहभागी झाले होते.
दरम्यान प्राचार्य श्री. व्ही जी परीट यांनी सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठित श्री अनिल खातू शेठ व सणगरेवाडी येथील बचत गटांच्या महिलांचे सहकार्य लाभले.