नागरिकांमधून नाराजी ; ते पथदिप हायवे प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली
नागरिकांमधून उपस्थित होतायत सवाल
कणकवली : शहरातील हायवेच्या ( सर्व्हिस रस्त्यावरील ) पथदिप बंद आहेत. शहरात सायंकाळच्या वेळी मोठी वर्दळ सुरू असते. तसेच सध्या दिवाळी सण सुरू आहे. अशातच कणकवली शहरातील पथदिप बंद असल्याची घटना आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मात्र हे पथदिप कोणत्या कारणास्तव बंद आहेत हे अद्याप समजलेले नाही. सायंकाळच्या वेळी विरंगुळा म्हणून फुटपाथवर ये – जा करत असलेले वृद्ध व्यक्ती किंवा ये – करणारे नागरिक यांना मागील काही दिवस अंधारातूनच ये – जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे पथदिप नियंत्रण हायवेप्राधिकरण पाहत असल्याने आता या प्रकाराकडे हायवे प्राधिकरण आणि अधिकारी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कणकवली शहरातील बंद असलेले पथदिप सुरू करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.