रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे २७फेब्रूवारीला खुली वाचक स्पर्धा

Google search engine
Google search engine

आचरा | अर्जुन बापर्डेकर : मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे सोमवार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता जिल्हास्तरीय खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धेसाठी प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर दहा ते बारा मिनिटे कालावधीत परीक्षणात्मक बोलायचे आहे.प्रथम येणाऱ्या दहा स्पर्धकांना संधी दिली जाणार आहे.यास्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु १००१ राधाबाई व जिवाजी मुणगेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भावना मुणगेकर मुंबई यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे.द्वितीय क्रमांक रु ८०१ संस्थेच्या सहकार्यवाह सौ उर्मिला सांबारी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे तृतीय क्रमांकरु६०१ संस्थेचे कार्यवाहअर्जुन बापर्डेकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहेत.उत्तेजनार्थ दोन बक्षिसे रु५०१/- अनुक्रमे संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अशोक कांबळी यांच्या कडून पुरस्कृत करण्यात आली आहेत.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २५फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी संस्थेच्या ग्रंथपाल विनिता कांबळी यांच्याशी ०२३६५-२४६०१७या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.