Rohit Sharma : शानदार षटकार, चौकारानंतर रोहितची विकेट

स्टेडिअम झाले चिडीचुप्प

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच रोहित शर्मा (Rohit Sharma) तुफान फॉर्ममध्ये होता. तीन षटकारांसह त्याने चार चौकार लगावले. मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. चेंडू झेलत रोहितची विकेट घेतली गेली.

अर्धशतक होण्याआधीच ४७ धावांवर रोहित शर्मा बाद झाला. लागोपाठ मारलेल्या षटकार आणि चौकारानंतर पडलेल्या विकेटने स्टेडिअम चिडीचुप्प झाले. सध्या विराट कोहलीची (Virat Kohli) तुफान फटकेबाजी सुरु आहे. त्याच्या साथीला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात उतरला आहे. विराटने चार शानदार चौकार लगावले आहेत.