तब्बल १५ वर्षांनी वडील बेपत्ता झाल्याची तक्रार

मालवण | प्रतिनिधी : मुंबई सिडकोमधील सेवानिवृत्त सर्व्हेअर जर्नादन बाळकृष्ण पोयरेकर (वय ८१) रा. वडाचापाट मालवण हे २००८ सालापासून बेपत्ता असल्याची खबर त्यांचा मुलगा अमित यांनी गुरुवारी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे.

जर्नादन बाळकृष्ण पोयरेकर हे मुंबई सिडकोमधून सर्व्हेअर म्हणून निवृत्त झाले होते. ११ फेब्रुवारी २००८ रोजी जर्नादन पोयरेकर हे मालवण तालुक्यातील वडाचापाट या गावी आले होते. गावी आल्यावर ते आंगणेवाडी येथे गेले होते. परंतु त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांचा शोध सुरूच होता. अखेर १५ वर्षांनी त्यांचा मुलगा अमित पोयरेकर यांनी वडील बेपत्ता असल्याची खबर पोलिसात दिली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करीत आहेत.