गुहागर | प्रतिनिधी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने पाटपन्हाळे सिनिअर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त मार्गदर्शन, चर्चा सत्र व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमासाठी मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांच्या सोबत सहायक मोटार वाहन निरीक्षक यासिन मुल्ला साहेब व सोयल ओव्हाळ हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात रस्ता सुरक्षे विषयी खूप मोलाचे मार्गदर्शन केले व मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले.या कार्यक्रमासाठी पाट पन्हाळे सीनियर कॉलेजचे प्राचार्य देसाई सर, खोत सर ,जाधव सर, सनये सर यांनी मोलाचे सहकार्य केले.त्याच प्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सद्गुरु मोटार ट्रेनिंग स्कूल च्या सर्व स्टाफ मेम्बर्सनी खूप महत्वाची कामगिरी बजावली.