पहा काय दिला आहे मनसेने रत्नागिरी नगरपरिषदेला ईशारा
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील घनकचरा नगरपरिषदे मार्फत प्रतिदिन २० ते २२ टन इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा करून तो साळवी स्टाॅप येथील डम्पिंग ग्राऊंडवर साठवला जातो जिथे कोणत्याही प्रकारचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच प्रदूषण होत आहे ..या घनकचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण ही होण्याची दाट शक्यता आहे , सदरहू डम्पिंग ग्राऊंडच्याच शेजारी जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे..दिवसेंदिवस कचऱ्याचे संकलन वाढत चालले असताना रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन या अतिमहत्त्वाच्या विषयावर उदासीन असून सदरहू प्रकल्प दांडेआडोम या ठीकाणी विनाविलंब व्हावा असे माननीय सुप्रीम कोर्ट ,हायकोर्टाचे आदेश असताना देखील नगरपरिषद प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली ही टाळाटाळ करत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदरहू प्रकल्प दांडेआडोम येथे विनाविलंब व्हावा अशी आग्रही व स्पष्ट मागणी मनसेच्या वतीने आज रत्नागिरी नगरपरिषदेकडे आज केली गेली मुख्याधिकारी श्री. बाबर यांनी यासंदर्भात एका महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प आपण मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे . याची दखल नगरपरिषदूने न घेतल्यास नगरपरिषद मा. सर्वोच्च न्यायालय तसेच मा. उच्च न्यायालयाचा अवमान करत आहात हे सिद्ध होत असल्याने जनतेच्या वतीने मनसे न्यायालयात जाणार असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी श्री. बाबर , मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, श्री. राजू पाचकुडे, अॅडवहोकेट श्री. प्रफुल्ल सावंत, श्री. जयेश दुधरे, श्री. सोम पिलणकर, श्री. शैलेश मुकादम, श्री. रूपेश चव्हाण, श्री. नैनेश कामेरकर, श्री. यश पोमेडकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.