मसुरे | झुंजार पेडणेकर :
जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा या प्रशालेचा शतक महोत्सव सोहळ्या निमित्त २४ जानेवारी ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जानेवारी रोजी
२.३० वा. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा शुभारंभ,
दुपारी 3 वाजता महिलांसाठी व जेष्ठ ग्रामस्थांची स्पर्धा ( हडी गाव मर्यादित ). २६ जाने. २०२३ रोजी ८ वाजता ध्वजवंदन, १०.३० वा. प्रभातफेरी, स. ११.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दु. १२.०० वा. श्री सत्यनारायणाची आरती व तिर्थप्रसाद, ३ ते ५.३० हळदीकुंकू, ६ ते ८.३० स्थानिक भजने,
९.३० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा, रा. १०.३० वा. शाळा नं. २ च्या आजी माजी विद्यार्थी पालक यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम.
२७ जाने २०२३ रोजी
रात्री १०.०० वा. श्री. विनय केसकर लिखित संतोष सावंत दिग्दर्शीत दोन अंकी विनोदी नाटक
‘गोंधळात गोंधळ’ होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन शतक महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.