पालघर येथील गणराज स्वयंसहाय्यता समूहाच्या रुचिरा पापड उद्योगाचे तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते उद्घाटन

मंडणगड | प्रतिनिधी : उमेद अंतर्गत गणराज स्वयंसहाय्यता समूह पालघर या समूहाने प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजने अंतर्गत पालघर येथे रुचिरा पापड उद्योग 19 जानेवारी 2023 रोजी सुरू करण्यात. आला. उद्योगातील विविध कामे गतीने व्हावीत यासाठी समुहाने नवीन मशिन घेतल्या त्याचे उद्घाटन मंडणगडचे तहसिलदार विजय सुर्यवंशी यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी विशाल जाधव उमेद तालुका अभियान व्यवस्थापक रुपेश मर्चंडे साहेब कृषी विभागाचे श्री पाटील, चव्हाण ग्रामसेवक, श्री पालवे, पालघर गावचे ग्रामस्थ अनंत घाणेकर अशोक बैकर यांच्यासह समूहातील महिला सदस्य उपस्थित होते.