प्रत्येक माणूस एक पुस्तक लिहू शकतो.पुस्तक हे त्या काळातील डाॅक्युमेंटेशन असत …. अभिनेत्री सुप्रिया विनोद                             

सुवर्णलता वालावलकर लिखीत गुज अंतरीचे पुस्तक प्रकाशन 

प्रत्येक माणूस एक पुस्तक लिहू शकतो पुस्तक हे त्या त्या काळातल डाॅक्युमेंटेशन असत…. असे उद्गगार सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद यानी काढले.“ गूज अंतरीचे” ह्या सुवर्णलता वालवलकर ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच स्वागत पार्क हाॅल विक्रोळी मुंबई येथे पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि प्रहार रत्नागिरी सिंधुदुर्गचे निवासी संपादक श्री. संतोष वायंगणकर ह्यांच्या हसते झाला.

ह्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुप्रियाजी म्हणाल्या की , हे पुस्तक जेव्हा माझ्याकडे प्रस्तावना लिहायला आलं तेव्हा मि ते वाचलं आणि अस वाटलं त्यांनी आणखी लिहायला हावं होतं. प्रत्येक आठवण वाचताना हे जाणवत होतं की ह्यात आणखी बऱ्याच गोष्टींची बिज दडलेली आहे. अजून एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की ह्या पुस्तकाच्या निमित्ताने खूप चांगली आणि प्रवाही मराठी भाषा वाचायला मिळाली. ह्यापलिकडे जाऊन मला भावणारी एक गोष्ट ह्यात आहे आणि ती म्हणजे प्रथितयश माणसाच्या घरात असण्याचे फायदे आणि तोटे किंवा त्यातून मिळणार वेगळं वातावरण ह्या पुस्तकात सदैव दिसत. सगळ्या लेखांमध्ये समाजसेवेचा एक मुख्य स्रोत दिसतो. माझे बाबा रत्नाकर मतकरी सांगायचे की प्रत्येक माणूस एक पुस्तक लिहू शकतो.

पुस्तक हे एक डॉक्युमेंटेशन असतं त्या त्या काळाच त्यांमुळे चांगलं लिहीत राहा. एका कॉम्रेडच घर पहिलेल्या व्यक्तीकडून मला पुढच्या पुस्तकाची अपेक्षा आहे. आपलं मनोगत व्यक्त करताना सुवर्णलता ह्यांनी ह्या पुस्तकाचा प्रवास विषद केला. व्यक्ती जे असतो त्यात तो कुठे जन्माला येतो ह्याचा फार मोठा हात असतो. बाबा कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय असल्यामुळे आमच्या घरात विचारांना पोषक अस वातावरण होतं. विविध प्रकारची माणस घरी यायची, चर्चा व्हायच्या. निव्वळ चळवळी नाहीत तर नाटक , साहित्य हयात वेगळे प्रयोग होत होते आणि ते खूप सजगतेने आम्ही पाहत होतो. आमच्या परिघा बाहेरचं जग पाहण्याचा संस्कार आमच्या घराने आम्हाला दिला. हे पुस्तक प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी आहे अस त्या म्हणाल्या. अध्यक्षीय भाषणात संतोष वायंगणकर म्हणाले ह्या पुस्तकात वेगळी माणस आहेत. एक सहजपणा आहे. आपण जे लिहिलय त्याचं डॉक्यूमेंटेशन होण फार गरजेचं आहे कारण ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल. पुस्तकात कोकणाचा खूप ठिकाणी उल्लेख झालेला आहे आणि कोकण आजही तसाच आहे. पू. ल. चा अतू बर्वा आजही इथे सापडतो. व्यक्त होण्याचा तुमचा हा प्रवास असाच चालू ठेवा अश्या शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

ह्या कार्यक्रमाला विलास पारकर, गाणेश खानोलकर, सुगंधी मोन्तरिओ, हेमकांत सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते. अमित वालावलकर यांनी आभार प्रदर्शन केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपक नाईक ह्यांनी केले.