मुलं पळवून नेत असल्याच्या गैरसमजातून वाद

Google search engine
Google search engine

मळगावमधील घटनेने उडाली खळबळ

इव्हेंट साठी मुले जात असल्याची पोलिसांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव येथे कंटेनर व दुसऱ्या ट्रकमध्ये किरकोळ अपघात झाला. या अपघाता दरम्यान कंटेनरमधील मुलांनी आरडाओरडा केला. यामुळे उपस्थितांमध्ये गैरसमज निर्माण होऊन वाद पेटला. यात चालकाला जाब‌ विचारत धारेवर धरलं गेलं. दरम्यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस दाखल झाले. पोलिस निरीक्षक म्हणाले, कंटेनरमध्ये एव्हेंटसाठी काम करणारी मुलं होती. ट्राफिक जाम झाल्यानं कंटेनरमध्ये असणाऱ्या मुलांनी दरवाजे वाजवल्यानं येथील काहींचा मुलं पळवून नेत असल्याचा गैरसमज झाला. मात्र, हि मुलं एका हॉटेलमध्ये असणाऱ्या एव्हेंटसाठी जात होती, अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.